लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात “संविधान दिन” उत्साहात साजरा…

लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात “संविधान दिन” उत्साहात साजरा…

*कोंकण एक्सप्रेस*

*लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात “संविधान दिन” उत्साहात साजरा…*

*दोडामार्ग.. शुभम गवस*

लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधानाचे सामूहिक वाचन करून सरनाम्याची शपथ देण्यात आली.
प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी भारतीय घटनेचे महत्त्व, नागरिकांचे अधिकार-कर्तव्य, मतदानाचा अधिकार आणि जबाबदार नागरिकत्वाविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वाचन वाढवून घटनाबाबत जाण वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात डॉ. संजय खडपकर, प्रा. दिलीप बर्वे, नगरपंचायत कर्मचारी, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. खडपकर यांनी, शपथ पुष्पलता गावडेंने, तर मतप्रदर्शन वैष्णवी कदम हिने केले. सूत्रसंचालन सानिया गवडळकर व आभार प्रीती कांबळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!