पिंटू गावडे यांना नगराध्यक्ष करा असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ला जाहीर प्रचार सभेत केले

पिंटू गावडे यांना नगराध्यक्ष करा असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ला जाहीर प्रचार सभेत केले

*कोंकण एक्सप्रेस*
*विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल असा विजय मिळवून द्या*
*पिंटू गावडे यांना नगराध्यक्ष करा असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ला जाहीर प्रचार सभेत केले*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश  गुरव*

वेंगुर्ला शहरातील विविध विकासकामांसाठी करोडो रूपयांच्या निधीतून शिवसेनेच्या माध्यमातून दिपकभाई यांच्या नेतृत्वाखाली कामे झाली आहेत. ही कामे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात महिलांसाठी केलेली योजनेचा लाभ असंख्य महिला घेत आहेत, त्यामुळे तुमच्यासाठी चौवीस तास काम करणारा नगराध्यक्ष तुम्हाला दिला आहे. विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल असा विजय मिळवून द्या असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ला जाहीर प्रचार सभेत केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांत सिंधुदुर्गचे संपर्कप्रमुख राजेश मोरे, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शहरप्रमुख उमेश येरम, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळ, सुहास कोळसुलकर, सुनिल मोरजकर, तालुका संघटक बाळा दळवी, युवासेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्निल गावडे, शहरप्रमुख सागर गावडे, महिला तालुकाप्रमुख शितल साळगांवकर, महिला शहरप्रमुख श्रद्धा बावीसकर व सर्व उमेदवार उपस्थित होते.
पुढे बोलताना सामंत म्हणाले की, अशी गर्दी बघितल्यानंतर मला असं वाटत की, निकाल आजच लागला. नगराध्यक्ष उमेदवारांनी सांगितलेल्या चौविस तास लोकांसाठी काम करणार आहे या शब्दामध्ये बदल होता नये. नऊ वर्षांनी नगरपरिषदेची निवडणुक होत आहे. ही निवडणुक होत असताना आमदार दिपकभाई केसरकर यांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाण या निशाणीवर आम्ही निवडणुक लढवित आहोत. योगायोगाने माझे गांव वेंगुर्ला आहे. त्यामुळे वेंगुर्लावासीयांना माझी एक विनंती आहे की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना वेंगुर्ला नगरपरिषद ही पिंटू गावडेसारख्या कार्यकत्र्याच्या ताब्यात द्यावी. मी शब्द देतो माझ्या गावातील एकही विकास काम मी शिल्लक ठेवणार नाही. मी पालकमंत्री असताना शहरातील नाट¬गृह, भाजीमार्केट, मच्छिमार्केट, बॅ.नाथ पै स्मारक या सारख्या कामांना निधी देण्याची संधी मला मिळाली. माझ घर ज्या भटवाडीमध्ये आहे, त्या भटवाडीतील नळपाणी योजनेला साठवर्षे कोणी पाहिले नव्हते. त्या कामाला 52 लाख रूपये देण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकत्र्याला मिळाली. त्यामुळे वेंगुर्लावासीयांचा विकास करण्याची जबाबदारी जशी केसरकरांची आहे, तशीच सामंत कुटुंबियांची सुद्धा आहे. दिपकभार्इंच्यावतीने आपल्याला एक विनंती करायची आहे की, आपण समाजाचे देणं लागतो आणि ते देणं फेडत देणं विकासातून फेडलं पाहिजे हे जरी बरोबर असले तरी वर्षानुवर्षे मोहन गावडेंच्या नेृत्वाखाली सामाजिक काम करत आहेत तेच काम तुम्ही सुरू ठेवा. हे वेंगुर्लेकर तुम्हाला डोक्यावर उचलून घेतील असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पिंटू गावडे यांना सुचित केले.
ज्याप्रमाणे सिंधुदुर्गाचे राजकारण सुरू आहे. ज्यापद्धतीने निलेश राणे आणि दिपक केसरकर यांना राजकीय टार्गेट बनविले जात आहे. तुमचा ग्रामस्थ म्हणून एक विनंती करतो, ज्या नेतृत्वाने तुम्हाला विकास दिला, ज्या नेतृत्वाने वेंगुल्र्यात विकासाची कामे करत असताना कसलीही गय केली नाही अशा व्यक्तीला जर कोणी त्रास देत असेल तर तुम्ही पेटून उठा आणि पिंटू गावडे यांना नगराध्यक्ष करा. माझ्या वेंगुल्र्यातील प्रत्येक माणूस, महिला भगिनी ही सुखी असली पाहिजे आणि तिच्या चेह-यावर कायमस्वरूपी 365 दिवस हास्य असले पाहिजे हा आमचा अजेंडा आहे. कोणाला त्रास देणे, कोणाला दादागिरी करणे, कोणाला त्रास देऊन नामोहरम करणे हे दिपकभार्इंनी कधी केले नाही. म्हणून वेंगुर्लावासीयांची जबाबदारी आहे. वेंगुल्र्याला इतिहास आहे. बॅ.नाथ पै सारखं उत्तुंग नेतृत्व या वेंगुल्र्यातून निर्माण झालं. त्यांचीच परंपरा आम्हाला पुढे न्यायची आहे म्हणूनच पिंटू गावडे आणि त्यांच्या सहका-यांना निवडून द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!