*कोंकण एक्सप्रेस*
*मनसे माजी मालवण शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांचा शिवसेनेत प्रवेश*
*आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती*
*मालवण | प्रतिनिधी*
आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसे पक्षाचे माजी मालवण शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांसह आनंद धुरी, महेश गावडे, प्रतीक ओटवणेकर, प्रशांत प्रभू, वैष्णवी ओटवणेकर, नेहा हळदणकर आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
आमदार निलेश राणे यांचे विकासकार्य व मालवण शहर विकासाचा दृष्टिकोन ठेवून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. असे विशाल ओटवणेकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

