सावंतवाडीत विशाल परब  यांनी संजू परब यांना दिला दणका

सावंतवाडीत विशाल परब  यांनी संजू परब यांना दिला दणका

*कोंकण एक्सप्रेस*

*सावंतवाडीत विशाल परब  यांनी संजू परब यांना दिला दणका*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात मोठा दणका मानला जाईल असा विशाल परब यांचा थेट राजकीय स्ट्राईक समोर आला आहे. संजू परब यांच्या समोर विशाल परब यांनी शांतीत क्रांती कशी करायची असते याचा जणू धडाच गिरवून दिलाय. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांना अवघ्या काही तासांत मोठा दणका बसला आहे. त्यांच्या प्रभागातील शेकडो शिवसैनिकांनी एकाचवेळी भाजपात प्रवेश करत नाट्यमय घडामोडी सावंतवाडीत घडवल्यात. प्रभाग ३ आणि १० मध्ये “ठाण मांडून बसणार” अशी धमकी संजू परब यांनी दिल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. या दोन्ही प्रभागात पैशांचा पाऊस पडेल, अशा चर्चा दबक्या आवाजात रंगल्या होत्या. मात्र या धमकीला उत्तर देताना भाजप युवा नेते विशाल परब यांनी थेट कृतीचा मार्ग अवलंबत संजू परब यांचे घरचे कार्यकर्तेच उचलले.

विशाल परब यांनी खासकरून प्रभाग ७ मधील खासकीलवाडा आणि प्रभाग ३ मधील चितारआळी भागातील शेकडो कार्यकर्त्यांना भाजपात दाखल करून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यालाच सुरुंग लावला आहे. यामुळे संजू परब यांच्या गडातच “विशाल परब” यांचा सायलेंटमे व्हायलेंट गेम सुरू झाल्याची चर्चा जोरात आहे.

दरम्यान, प्रभाग ७ मध्ये संजू परब विरुद्ध भाजपचे उदय नाईक अशी लक्षवेधी लढत होणार असून, माजी नगराध्यक्ष विरुद्ध माजी नगरसेवक अशा ‘काटे की टक्कर’कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रवेशावेळी विशाल परब यांनी दिलेला दणका हा थेट संजू परब याना असला तरी त्याचे शिवसेनेच्या सर्व उमेदवाराना बसले आहेत हे नक्की!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!