विविध कार्यक्रमांनी बालदिन यादगार

विविध कार्यक्रमांनी बालदिन यादगार

*कोंकण एक्सप्रेस*

*विविध कार्यक्रमांनी बालदिन यादगार*

*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*

येथील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलच्यावतीने सिद्धिविनायक मंगल कार्यालयात 14 नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांनी बालदिन साजरा करण्यात आला.
प्रारंभी पालक संघाचे अध्यक्ष सुजित चमणकर व महिला पालक प्रतिनिधी प्रिती शिंदे यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरून यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. हा बालदिन म्हणून शालेय विद्याथ्र्यांसाठी शिक्षकांनी आयोजित केलेला एक सोहळाच होता. मुख्याध्यापक मनिषा डिसोजा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम घेण्यात आले. शिक्षकांनी विद्याथ्र्यांचा शालेय गणवेश परिधान करून सुंदर नृत्य सादर केले. विद्यार्थी शालेय जीवनात शाळेच्या पहिल्या दिवसापासून अगदी सहजपणे त्यांच्या नकळत कोणकोणत्या कृती करत असतात याचे सुंदर दर्शन शिक्षकांनी आपल्या नाटकातून घडविले. तर समुहगीतातून शिक्षकांनी बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्याथ्र्यांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळही घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रियांका मिसाळ व समिधा तेंडोलकर यांनी केले. तर आभार शिक्षक नितीन कुलकर्णी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!