भाजपाच्या प्रचार यंत्रणेचा शुभारंभ

भाजपाच्या प्रचार यंत्रणेचा शुभारंभ

*कोंकण एक्सप्रेस*

*भाजपाच्या प्रचार यंत्रणेचा शुभारंभ*

*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*

आजपासून सर्व देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन या वेंगुर्लावासीयांच्या आशीर्वादासाठी सर्व उमेदवार जाणार आहेत. यापूर्वी सुद्धा भाजपवर वेंगुर्लावासीयांनी विश्वास ठेवला होता. तसाच विश्वास यावेळी सुद्धा ठेवतील याची खात्री आहे. आरोग्यासहित जनतेसाठी विविध सोईसुविधांवर भर देत असतानाच वेंगुर्ला बंदराला विकसित करून देश विदेशातील पर्यटक याठिकाणी येतील व पर्यटनदृष्ट्या या शहराला भविष्यात अधिक विकसित करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी व्यक्त केली.
वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामदैवत श्री सातेरी आणि श्री रामेश्वर यांना श्रीफळ ठेऊन भाजपाने आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजपा राज्य परिषद सदस्य राजू राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाप्रमुख पपू परब, महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप गिरप आणि मंजूषा आरोलकर, रवींद्र शिरसाठ, गौरी माईणकर, प्रितम सावंत, विनायक गवंडळकर, गौरी मराठे, आकांक्षा परब, सुधीर पालयेकर, सुषमा प्रभूखानोलकर, विनय नेरूरकर, रीया केरकर, सदानंद गिरप, काजल कुबल, सचिन शेटये, श्रेया मयेकर, प्रसाद गुरव, युवराज जाधव, यशस्वी नाईक, प्रणव वायंगणकर, शीतल आंगचेकर आदी नगरसेवक पदाच्या उमेदवारांसहीत भाजपाचे पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटोओळी – सातेरी मंदिरात श्रीफळ ठेऊन भाजपाने प्रचाराचा शुभारंभ केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!