*कोंकण एक्सप्रेस*
*हळवल ग्रामपंचायत येथे उद्या आयुष्मान कार्ड कॅम्पचे आयोजन*
*नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन*
*कणकवली : संजना हळदिवे*
तालुक्यातील हळवल ग्रामपंचायत येथे उद्या ( दि. १७ नोव्हेंबर २०२५ ) रोजी आयुष्मान भारत योजने अंतर्गत आयुष्मान कार्ड कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. हा कॅम्प सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पार पडणार आहे. ज्या नागरिकांची आयुष्मान कार्डे अद्याप तयार झालेली नाहीत, त्यांनी आधार कार्ड व मोबाईलसह वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या कॅम्पचा नागरिकांनी लाभ घेऊन आपली कार्डे त्वरित तयार करून घ्यावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

