*कोंकण एक्सप्रेस*
*कुर्ली येथे नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाकडून मोफत शैक्षणिक साहित्य वाटप*
*फोंडाघाट :प्रतिनिधी*
कुर्ली गावातील विद्या मंदिर कुर्ली खडकदारा, जिल्हा परिषद केंद्र शाळा कुर्ली तसेच कुर्ली हायस्कूल या तिन्ही शाळेमध्ये नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळामार्फत इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना विषयानुसार चित्रकला, आलेख तसेच प्रोजेक्ट साठी वह्या आणि मुलांना सॅंडल ,शूज चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमावेळी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या वतीने नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे आभार व्यक्त केले.
या प्रसंगी नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, सचिव धीरज हुंबे, नवीन कुर्ली प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित दळवी, कुर्ली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यवान मडवी, कृष्णा परब, आशिष पेडणेकर, विजय कोलते तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व शिक्षण प्रेमी उपस्थित होते

