*कोंकण एक्सप्रेस*
*समुहनृत्य स्पर्धेत शेणई बालवाडी प्रथम*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव) *
– नगर वाचनालय, वेंगुर्ला संस्थेतर्फे कै.सौ.शुभदा अविनाश शेणई स्मृतिप्रित्यर्थ शहर मर्यादित अंगणवाडी व बालवाडीतील मुलांसाठी घेण्यात आलेल्या समुहनृत्य स्पर्धेत शेणई बालवाडी वेंगुर्लाने प्रथम क्रमांक पटकाविला.
ही स्पर्धा ८ नोव्हेंबर रोजी नगर वाचनालय संस्थेच्या कै.केशवराव अंकुश कुबल रंगमंचावर घेण्यात आली. यात एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलने द्वितीय तर अंगणवाडी भटवाडी नं.१ने तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे परिक्षण महेश बोवलेकर व विठ्ठल करंगुटकर यांनी केले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार उपकार्यवाह माया परब, श्रीनिवास सौदागर, निशिगंधा पवार, भाऊ करंगुटकर, अंगणवाडी ताई, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. विजेत्यांना तसेच अंगणवाडी ताईंना जानेवारी २०२६ मध्ये सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.

