विद्यामंदिर कणकवलीचे चतुर्थश्रेणी कर्मचारी अरुण इंगळे सेवानिवृत्त

विद्यामंदिर कणकवलीचे चतुर्थश्रेणी कर्मचारी अरुण इंगळे सेवानिवृत्त

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर कणकवलीचे चतुर्थश्रेणी कर्मचारी अरुण इंगळे सेवानिवृत्त*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीचे चतुर्थश्रेणी कर्मचारी, विद्यामंदिरची आई म्हणून ओळखले जाणारे, चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून आदर्श निर्माण करणारे व सेवेतून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्श शिपाई म्हणून नाव कमावणारे श्री अरुण इंगळे नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती समारंभाप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे यांनी प्रशालेतर्फे शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन श्री व सौ इंगळे यांचा यथोचित सत्कार केला. विद्यामंदिर मराठी माध्यम, विद्यामंदिर इंग्रजी माध्यम, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, तसेच प्रशालेचे माजी शिक्षक यांनीही अरुण इंगळे यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे यांनी शुभेच्छा देताना इंगळे वर कौतुकाचा वर्षाव करताना सांगितले की इंगळे हा प्रामाणिक, शाळेविषयी निष्ठा असलेला ,शाळेसाठी सदैव त्याग करणारा असा आदर्श शिपाई होता. शाळेचा परिसर सुंदर ठेवणे व शाळेत बाग सजवण्यामध्ये इंगळेचा सिंहाचा वाटा होता . कुठल्याही कामासाठी तो सदैव तत्पर असायचा.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कणकवली कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक महालिंगे यांनी पुढील जीवनात कुटुंबासाठी वेळ द्या व आर्थिक नियोजन करा असा त्याला मौलिक सल्ला दिला. प्रशालेचे पर्यवेक्षक अच्युतराव वनवे यांनीही इंगळेच्या कामाचे कौतुक करताना सांगितले की इंगळे च्या शब्दकोशात नाही हा शब्दच नव्हता. कामातूनच त्याने सर्व अधिकारी, कर्मचारी, पालक व समाजामध्ये लोकप्रियता कमावली. याप्रसंगी संदीप कदम, अमोल शेळके, सुविधा राणे, सौ.करंबेळकर, धाकू तानावडे, श्रद्धा कदम यांनी इंगळे च्या कामाचे कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे. जे. शेळके तर आभार प्रदर्शन प्रसाद राणे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!