तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यामंदिर हायकूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश

तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यामंदिर हायकूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश

*कोंकण एक्सप्रेस*

*तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यामंदिर हायकूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश*

वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था फोंडाघाट यांचे मार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते त्यातील चित्रकला व रांगोळी स्पर्धेमध्ये विद्यामंदिर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे
वंदे मातरम गीतलेखनास 150 वर्षे पूर्ण होत आहेत. वंदे मातरम गीताचे भारताचे स्वातंत्र्य लढ्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे या निमित्ताने औद्योगिक प्रशिक्षण संस्था फोंडाघाट येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .त्यापैकी चित्रकला व रांगोळी स्पर्धेमध्ये विद्यामंदिर हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते त्यातील रांगोळी स्पर्धेमध्ये पार्थ कांबळे याच्या रांगोळीस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले तर चित्रकला स्पर्धेमध्ये छोट्या गटामध्ये मोहित सुतार प्रथम, मृणाल पाटील व्दितीय, भक्ती गावडे तृतीय तर मोठ्या गटामध्ये गौरेश काडगे प्रथम, तुषार मेस्त्री द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे सदर स्पर्धेमध्ये तालुक्यातील 60 विद्यार्थी सहभागी झाले होते यशस्वी विद्यार्थ्यांना 7 नोव्हेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था फोंडाघाट येथे कार्यक्रमाचे आयोजन करून मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित आले
यशस्वी विद्यार्थांना प्रशालेचे कलाशिक्षक श्री प्रसाद राणे सर यांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थांच्या या यशाबद्दल प्रशालेमध्ये सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी मुख्याध्यापक श्री.पी जे कांबळे, पर्यवेक्षक – श्री. ए.व्ही वणवे, ज्येष्ठ शिक्षिका सौ.संगीता साटम, श्री. जे. जे. शेळके ,कलाशिक्षक श्री. प्रसाद राणे व इतर शिक्षक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!