*कोंकण एक्सप्रेस*
*शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री विजयकुमार वळंजू साहेब यांनी श्री अरुण इंगळे यांचा सेवापूर्ती निमित्त केला हृदय सत्कार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री अरुण रामकृष्ण इंगळे हे प्रशालेतून 30 वर्षे सेवा करून ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी नियत वयोमानाने निवृत्त झाले शाळेपासून ते संस्थेच्या पदाधिकारी यांच्या मनाला स्पर्शून अरुण इंगळे यांनी आपले अथक परिश्रम सार्थकी लावले . कोणताही स्वार्थ ‘गर्व’ अंहभाव यांना आपल्या आयुष्यात थारा न देता केवळ कर्तव्य श्रेष्ठ मानून प्रामाणिकपणाला महत्त्व देणारे इंगळे हे समाजमनात कायमचे घर करून निवृत्त होत आहे असे गौरव उद्गार शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री विजयकुमार वळंजू साहेब यांनी अरुण इंगळेचा सत्कार करतांना काढले .

