*कोंकण एक्सप्रेस*
*दिलीप रावराणे यांच्या प्रयत्नांतून नाम. नितेश राणे यांच्याकडून निधी मंजूर*
*वैभववाडी (प्रतिनिधी)*
आचिर्णे गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गावातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे यांच्या प्रयत्नातून या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. या कामामध्ये आचिर्णे मुख्य रस्ता ते सुशील रावराणे घराकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 10 लाख रु., आचिर्णे मुख्य रस्ता तेलीवाडी रस्ता काँक्रिटीकरण करणे – 5 लाख रु., आचिर्णे कडूवाडी शाळा इमारत दुरुस्त करणे – 5 लाख रु. तसेच आचिर्णे कडूवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे – 5 लाख रु.या कामांचा समावेश आहे.
मंगळवारी या कामांचे भूमिपूजन पार पडले. यावेळी सरपंच वासुदेव रावराणे, युवा कार्यकर्ते सिद्धेश उर्फ बंटी रावराणे, आदेश रावराणे, भाई रावराणे, सुशील रावराणे, रुपेश रावराणे, वासुदेव रावराणे, सत्यवान जाधव, शशिकांत रावराणे, श्रीधर कडू, शिवाजी कडू, महादेव कडू, तातू कडू, प्रमोद कडू, शेखर कडू, अनंत तेली, लक्ष्मण जाधव, विजय तेली, महेश जाधव, प्रसाद तेली व ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

