अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरु

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरु

*कोंकण एक्सप्रेस*

*अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरु*

*सिंधुदुर्गनगरी*

– माहे ऑक्टोंबर 2025 मध्ये सततच्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान होत आहे. या नुकसानीच्या बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनाचे करण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर सुरु झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार 31 ऑक्टोंबर अखेर जिल्ह्यातील 4338 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सदर नुकसान 525 गावामध्ये झाले असून 17172 शेतकरी बाधित झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिली आहे.
माहे ऑक्टोंबर 2025 मध्ये अवकाळी पावसामुळे भात, नाचणी पिक व इतर शेती पिकाचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे क्षेत्रीय स्तरावरील सहायक कृषि अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येत आहेत. ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असल्यास त्यांनी संबंधित ग्रामस्तरीय क्षेत्रीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्रीमती नाईकनवरे यांनी केले आहे.


आज दि. 03/11/2025 रोजी मा. जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे यांनी मौजे कुसरवे तालुका मालवण येथील शेतकरी संजय चव्हाण यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भात शेतीचे भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, तहसीलदार मालवण वर्षा झाल्टे, तालुका कृषी अधिकारी मालवण अमोल करंदीकर तसेच महसूल,कृषी आणि ग्रामविकास विभागाचे संबंधित क्षेत्रिय अधिकारी, सरपंच व उपसरपंच वराड ग्रामपंचायत, पोलीस पाटील कुसरवे आणि इतर शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी उपस्थित क्षेत्रिय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!