सिंधुदुर्ग स्टेशनवर एनराकूलम मरू सागर अजमेर रेल्वेचे भव्यस्वागत

सिंधुदुर्ग स्टेशनवर एनराकूलम मरू सागर अजमेर रेल्वेचे भव्यस्वागत

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग स्टेशनवर एनराकूलम मरू सागर अजमेर रेल्वेचे भव्यस्वागत*

*सिंधुदुर्ग नगरी*

कोकण रेल्वे प्रवासी समन्वय संघटनाकोकण रेल्वे बोर्ड आणि रेल्वे प्रशासनाच्याअथक प्रयत्नानंतर सिंधुदुर्ग या जिल्हा मुख्यालयाच्या स्टेशनवर म रुसागर अजमेर एक्प्रेस गाडीला सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर रेल्वे बोर्डाने मंजूर केल्याप्रमाणे मरु सागर एक्सप्रेस या नव्या गाडीचा पहिल्याचथांबा मिळाल्याने स्वागतासाठीकोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती आणि सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन संघटना दशकोशीतील सरपंच रेल्वे प्रवासी नागरिक यांच्या वतीने मोटरमन स्टेशन मास्तर गार्ड यांना पुष्पगुच्छ देऊन या रेल्वेगाडीला हार व श्रीफळ वाढवून भव्यस्वागत करण्यात आले .
सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय स्टेशनवर आंध्र कुलम अजमेर मरुसागर या नव्या गाडीसाठी सिंधुदुर्ग स्टेशनला पहिलाच थांबा मिळाला या गाडीच्या स्वागतकरण्यात आले यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि संबंधित समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर ,सचिव अजय मयेकर ,जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर,उपाध्यक्ष परशुराम परब जिल्हा कार्याध्यक्ष शुभम परब,सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन संघटना अध्यक्ष आप्पा मांजरेकर ,सचिव सुमित सावंत .,उपाध्यक्ष प्रणाली अवसरे,जिल्हा सहसचिव साई आंबेरकर ,कसाल सरपंच राजन परब, तळगाव सरपंच लता खोत, जयेंद्र परब, रिक्षा संघटना अध्यक्ष सुनील पाताडे, गावराई सरपंच सोनल शिरोडकर,मंदार पडवळ,सहसचिव राहूल शिर्के,विष्णू प्रसाद दळवी, महेश परुळेकर विलास पालव, मिडीया प्रतिनिधी संजय वालावलकर, एमआयटीएम कॉलेजचे प्राचार्य श्री.धनाल, संस्था प्रतिनिधी विनोद कदम, शिक्षक शिंदे , सई पवार आदीसहदशक्रोशीतीलनागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मोटरमन कदम , पि के सावंत स्टेशनमास्टर यांचे स्वागत केले
सिंधुदुर्ग नगरी हे जिल्हा मुख्यालयाचे मुख्य स्टेशन आणि या स्टेशनवर जलद गाड्यांना थांबा द्या या मागणीबाबत सातत्याने मागण्या आणि जनआंदोलन उभारून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले होते त्याचबरोबर खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे ,आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातूनही रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला होता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, कोकण रेल्वे रिजनल मॅनेजर श्री शैलेश बापट , कोकण रेल्वे बोर्डाने सिंधुदुर्ग स्टेशनवर मरू सागर एक्सप्रेस या साप्ताहीक जलद गाडीला थांबा मंजूर केला असून दुपारच्या वेळेत ठीक १२.३४ वाजता मुंबईच्या दिशेने जाणारी ही मरुसागर अजमेर एक्सप्रेस थांबा आहे आज ही गाडी सिधुदूर्ग स्टेशनवर दुपारी १ .२० वाजता आली त्यानंतर स्वागत केले यानंतर एनराकूलम हजरत निजामुद्दीन गाडी ६ नव्हेंबर रोजी सायं ७ वाजता येईल त्याचे वेळापत्रकाप्रमाणे ठरवू
यावेळी झालेल्या बैठकीत स्टेशन जोडणारे रस्ते ,फाटक ऐवजी उदाण पूल, याचा पाठपुरावा करावा जिल्हा केद्र असल्याने जनशताब्दी व नेत्रावती या दोन गाडया थांब्यासाठी पाठपुरावा करूया दशक्रोशीतून वाढती मागणी आहे, सिधुदुर्ग स्टेशनचे प्रवेश गेट काम अपूर्ण आहे ते पूर्णव्हावे पिआरएस सिस्टीम झाल्यापासून तिन महिन्यात उत्तम प्रतिसाद आहे यासाठी ही सुविधा लाभवाढीसाठी जास्तीत जास्त लोकांनी ग्रामपंचायतीने सहकार्य करावे असे आवाहन करण्याचे निश्चित केलेसिंधुदुर्ग स्टेशनच्या सुशोभीकरण आणि अंतर्गत कामांच्या बाबतही पाठपुरावा करण्याचे ठरले
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पावसकर यांनी कोकण रेल्वे प्रवासीसमन्वय संघर्ष समितीनेसातत्याने केलेल्या पाठपुरावा चेआणि जन आंदोलन तसेच खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे यांच्यासह रेल्वे बोर्डकोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष झा रेल्वेचे रिजनल मॅनेजर शैलेश बापटयांच्यासह जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सततचा केलेला पाठपुराव्याचे हे फलित आहे कोकण रेल्वेच्या या मागणीला काहीशी यश आले असून अजूनही जिल्ह्यातील वैभववाडी नांदगाव मडूरासहकारी टेशन च्या जलद गाड्यांना थांबा व तेथील कामांचा पाठपुरावा सुरू आहे यावेळी जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी कोकण रेल्वेच्या सिंधुदुर्गातील दहाही स्टेशनच्या सुशोभीकरण आणि जलद गाड्यांना थांबा पी आर एस तिकीट कोठा यासह कोल्हापूर वैभववाडी सावंतवाडी कोल्हापूर अशा रेल्वे महामार्ग तसेच रेल्वेच्या दुपाद्रीकरणासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि समन्वय समिती सातत्याने पाठपुरावा करत आहे यासाठी खासदार पालकमंत्री आमदार यांचेही सहकार्य मिळत आहे रेल्वे बोर्डाने हे यासाठी सहकार्य केले असेच उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त करून प्रवाशांच्या वाढत्या गर्दी आणि गैरसोयीबाबत कोकण रेल्वे महामार्गावर शिवाजी टर्मिनल ते सावंतवाडी मडगाव ही कोकण कन्या आधी स्वतंत्र गाडी सुरू करावी ही आमची सातत्याची मागणी आहे या मागणीकडे मात्र अद्याप रेल्वे प्रशासन रेल्वे बोर्ड आणि येथील लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत असल्याचेही खंत त्यांनी व्यक्त केली. शेवटी उपस्थित यांचे आभार जिल्हा सचिव अजय मयेकर यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!