*कोंकण एक्सप्रेस*
*रेवंडी येथील भद्रकाली देवीचा ७ रोजी जत्रोत्सव*
*मालवण (प्रतिनिधी)*
मालवण तालुक्यातील रेवंडी गावची ग्रामदेवता श्री देवी भद्रकाली मातेचा वार्षिक जत्रोत्सव दि. ७ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे.
यानिमित्ताने भद्रकाली मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम व रात्री दहिकाला होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवास उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.

