मालवण समुद्रकिनारी मिळालेल्या व्हेल माशांचे सांगाडे पर्यटन दृट्या जतन संवर्धन करावे :-विष्णू मोंडकर मालवण तालुका अध्यक्ष भाजपा

मालवण समुद्रकिनारी मिळालेल्या व्हेल माशांचे सांगाडे पर्यटन दृट्या जतन संवर्धन करावे :-विष्णू मोंडकर मालवण तालुका अध्यक्ष भाजपा

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवण समुद्रकिनारी मिळालेल्या व्हेल माशांचे सांगाडे पर्यटन दृट्या जतन संवर्धन करावे :-विष्णू मोंडकर मालवण तालुका अध्यक्ष भाजपा*

*पालकमंत्री श्री नितेशजी राणे यांच्या कडे निवेदना द्वारे केली मागणी*

*मालवण : प्रतिनिधी*

समुद्रातील वादळी वातावरण यांमुळे दोन व्हेल मासे मृत अवस्थेत मालवण समुद्रकिनारी वाहत आले असून या माशांचे सांगाडे जतन,संवर्धन करून पर्यटन व पर्यावरण दृष्या या जिल्ह्यात पर्यटनासाठी भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी उपलब्द केल्यास पर्यटनासाठी तसेच समुद्री ,जैविक विषयी अभ्यासकांसाठी एक माध्यम निर्माण होईल माननीय प्रदेश अध्यक्ष व माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून तारकर्ली समुद्र किनारी राज्य सरकारच्या प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून 3 कोटी मंजूर झाले असून यासाठी 60 गुंठे सरकारी पड जागा सार्वजनिक बांधकाम विभागाने निच्छित करून जमीन संपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कडे पाठविला असून जागा मान्यता अंतिम टप्यात आहे सदर ठिकाणी समुद्र किनारी म्युझिअम उभारता येईल.सदर माशांचा पैकी एक सांगाडा सिंधुदुर्ग किल्ला समोरील खडकामध्ये स्थिरावला असून दुसरा व्हेल मासा वायंगणि समुद्री किनारी जेसीबी च्या माध्यमातून समुद्र किनारी पुरला आहे या ठिकाणी वरून शासनाने ताब्यात घेऊनआवश्यक ती केमिकल प्रक्रिया करून माश्याचा सांगाड्याचा म्युझिअम करावे त्यामाध्यमातून एक नवीन माहिती केंद्र मालवण ला तयार होईल जिल्हयात भेट देणाऱ्या दहा लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देत असतात या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटन वाढी साठी अजून एक पर्यटन स्थळ वाढेल यांसाठी मस्त्यव्यवसाय खाते व कांदळवन खात्याच्या संयुक्त विद्यमाने जतन संवर्धन करण्याची आदेश देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे या निवेदनाद्वारे विनंती केल्याची माहिती विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंग ,अध्यक्ष मालवण तालुका अध्यक्ष भाजपा यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!