*कोंकण एक्सप्रेस*
*दिविजा वृद्धाश्रमाने शालेय विद्यार्थ्यासाठी दिवाळीनिमित्त उटणे वाटप : आजी आजोबांकडून मुलांना मिळाली सुगंधी भेट*
*सिंधुदुर्ग (तळेरे)*
आज कालच्या आधुनिक युगात तरुण पिढी आधुनिकीकरणाकडे वळत चालली आहे. दिवाळीला सुगंधी उटणे वापरणे विसरत चालली आहे. आपली पारंपरिक संस्कृती विसर पडू नये ह्या करता दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांनीं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, कणकवली व मालवण तालुकयातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत उटणे वाटप करून एक आगळा वेगळा उपक्रम राबवला. दिवाळी पूर्वीच आजी आजोबांनी या मुलांना सुगंधी भेट दिली.
दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी आपल्या शालेय नातवंडांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पारंपारिक उटणे स्वतः बनवून विद्यार्थ्यांना वाटले. दिविजा वृद्धाश्रमाचे संचालक संदेश शेट्ये यांनी आजी आजोबांचे हे शुभ आशीर्वाद कणकवली, देवगड व मालवण तालुक्यातील जवळ जवळ 20 हजार विद्यार्थ्यांना देण्यात आले.आज कालच्या तरुण पिढीला उटणे, कारटी, पणत्या, रांगोळ्या या पारंपारिक गोष्टींचा विसर पडत चालला आहे. आपली संस्कृती काय आहे हे जाणून देण्यासाठी दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी विद्यार्थ्यांना मोफत उटणे वाटण्याचा कार्यक्रम केला. उटण्याच्या माध्यमातून आजी आजोबांना आपल्या शालेय नातवडांना भरभरून आशीर्वाद व प्रेम पाठवले आहे.
कणकवली,देवगड व मालवण तालुक्यातील माध्यमिक शाळा कोळोशी हडपिड ,शिरगाव केंद्र शाळा नं १, प्राथमिक शाळा कोळोशी हडपिड, प्राथमिक शाळा कोळोशी वरचीवाडी,प्राथमिक शाळा असलदे गावठणवाडी,प्राथमिक शाळा असलदे मधलीवाडी,प्राथमिक शाळा हडपिड खालचीवाडी,प्राथमिक शाळा शिरगाव राकसवाडी,प्राथमिक शाळा शिरगाव निमतवाडी,प्राथमिक शाळा शिरगाव आंबेखोल,कणकवली कॉलेज कणकवली, विद्यामंदिर हायस्कुल कणकवली, एसएम हायस्कुल कणकवली, बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कुल जाणवली, कळसुली शाळा ,वामनराव महाडिक विद्यालय तळेरे, कासार्डे विद्यालय, वारगाव प्राथमिक शाळा नं 1, वारगाव प्राथमिक शाळा नं 3,प्राथमिक शाळा असलदे तावडेवाडी ,सरस्वती हायस्कूल नांदगाव,मठ माध्यमिक शाळा , जि.प.प्राथमिक शाळा नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट ,मालवण तालुका शाळा,चौके हायस्कूल ,आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल,शिरगाव हायस्कूल ,इंग्लिश मिडीयम स्कूल फोंडाघाट,आर्ट्स &कॉमर्स कॉलेज फोंडाघाट ,केळकर कॉलेज देवगड अशा या शाळेतील विद्यार्थ्यांना उटणे वाटप करण्यात आले.
एक हात मदतीचा आजी आजोबांचे मायेचे घर म्हणून नावारूपास आलेले स्वस्तिक फाउंडेशन संचलित दिविजा वृद्धाश्रम हे आजी आजोबांसाठी आपुलकीचे घर बनले असून ते एक कुटुंब निर्माण झाले आहे. या वृद्धाश्रमाला आर्थिक अथवा वस्तू रूपाने मदत करायची असल्यास श्री. संदेश शेट्ये : 9223221400 यावर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

