*कोंकण एक्सप्रेस*
*मार्केट यार्ड मधील शेतकरी भवनसाठी १ कोटी ५२ लाखांचा निधी*
*कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे यांची माहिती ; पालकमंत्री नितेश राणे , पणन मंत्री जयकुमार रावल यांचे निधी दिल्याबद्दल मानले आभार*
*कणकवली : प्रतिनिधी*
कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट यार्ड नांदगाव रेल्वे स्टेशन येथील वाघेरी येथे उभारण्यात येत आहे. बाजार समितीच्या ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत मार्केट यार्ड मधील शेतकरी भवनसाठी १ कोटी ५२ लाखांचा निधी पालकमंत्री नितेश राणे , पणन मंत्री जयकुमार रावल , खा. नारायण राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. त्यामुळे आगामी काळात मार्केट यार्ड मध्ये आलेल्या शेतक-याला त्याचा शेतमाल ठेवण्यासाठी तसेच त्याला राहण्यासाठी व खाण्यापिण्याच्या व्यवस्थेसाठी शेतकरी भवन सेवेचे ठरणार आहे.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीने जुन महिन्यात पणन विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार हा शेतकरी भवन साठी निधी मंजुर झालेला आहे . त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे व पणन मंत्री जयकुमार रावल यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व सर्व सभासदांच्यावतीने सभापती या नात्याने मी आभार मानतो. कारण सिंधुदुर्गातील शेतक-यांना स्वत:चे मार्केट यार्ड निर्माण होत आहे. याचे आम्हा सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला अभिमान वाटत आहे, असे सभापती तुळशीदास रावराणे यांनी सांगितले.
नांदगाव रेल्वे स्टेशन जवळ घेतलेली स्व मालकीची जमीन आहे.बँकेने सहकार्य केले आहे.राष्ट्र संत तुकडोजी महाराज शेतकरी भवन मंजूर आहे.पणन संचालक यांच्याकडे जिल्हा निबंधक यांच्या शिपारशीने पाठवला होता.पालकमंत्री नितेश राणे यांना शिफारस देण्यासाठी विनंती केली.
या शेतकरी भवनामध्ये बाहेरच्या जिल्ह्यांमधून देखील मोठ्या प्रमाणात व्यापारी येतील. त्यांचीही व्यवस्था होणार आहे. आपल्या जिल्ह्यात असलेल्या शेतक-यांना , बागायतदारांना त्याठिकाणी , मालाची विक्री न झाल्यास एखादी रात्र शेतकरी भवन मध्ये व्यवस्था होणार आहे. या ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत शेतकरी भवनासाठी 1 कोटी 52 लाख निधी मंजूर झाला आहे. मार्केट यार्डच्या जागेत हे शेतकरी भवन होणार आहे. शासनाकडून या शेतकरी भवनसाठी 70 टक्के निधी शासन देणार आहे. म्हणजेच 1 कोटी 6 लाख मिळतील. आणि उर्वरित रक्कम कृषी उत्पन्न बाजार समितीने उभी करायची आहे. या निधीची व्यवस्था पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून केली जाणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे 50 टक्के बांधकाम पूर्ण होत आलेले आहे. वेगवेगळ्या शेड इमारतींचे बांधकाम पूर्ण होत आहे. त्यामुळे शेतक-यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे मार्गदर्शन आम्हा संचालकांना सातत्याने राहिले आहे. त्यामुळेच पालकमंत्री नितेश राणे , जिल्हा बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या माध्यमातून मार्केट यार्ड साठी जमीन खरेदी करता आली. हे सर्वसामान्य शेतक-यांचे स्वप्न होते , ते साकार करण्याचे भाग्य आमच्या सारख्या सहकार क्षेत्रात काम करणा-या कार्यकर्त्यांना मिळाले , असे सभापती तुळशीदास रावराणे यांनी सांगितले.

