हिच ती वेळ कर्जमाफी करण्याची ; दोडामार्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

हिच ती वेळ कर्जमाफी करण्याची ; दोडामार्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

*कोंकण एक्सप्रेस*

*हिच ती वेळ कर्जमाफी करण्याची ; दोडामार्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष*

*दोडामार्ग : शुभम गवस*

संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी संकटात आहे असून सरसकट शेती कर्ज माफ करून.. सातबारा कोरा‌ करण्याबाबत. तसेच
महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली असून.. महाराष्ट्रातील मराठवाडा, कोकण व पश्चिम महाराष्ट्र याठिकाणी शेतकरी संकटात सापडले आहेत.. महायुती निवडणुकी पूर्वी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते.. योग्य वेळ आली की कृषी कर्ज माफ करू असं सरकार मधील मंत्री सांगत होते..आज योग्य वेळ असून
. शेतकरी संकटात आहे..ही कर्ज माफी झाली पाहिजे,तसेच अतिवृष्टी मुळे नुकसान ग्रुस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रू नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. तसेच,पीक विमा चे कठीण निकष बाजूला.. पंचनामे न करता.. सरसकट पीकविमा ची रक्कम शेतकऱ्यांना दिली पाहिजे..या सर्व मुद्यांवर दोडामार्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या वतीने .सदर निवेदन दोडामार्ग तहसीलदार यांच्या जवळ सादर करण्यात आले.. तसेच त्यानी आमच्या भावना शासनाकडे पोहचविण्यात याव्यात अशी विनंती ही केली आहे..
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस, सौ. विनीता घाडी संदेश राणे,संदेश वरक,मदन राणे, मिलिंद नाईक,संजय सुतार, सिद्धेश कासार, शुभंकर देसाई, भिवा गवस,प्रदीप सावंत दशरथ मोरजकर, अलविन लोबो आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!