*कोंकण एक्सप्रेस*
*साळशी येथील शंकर रावले यांचे निधन*
*शिरगाव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील साळशी -सरमळेवाडी येथील रहिवासी तथा सुखशांती मंडळाचे माजी अध्यक्ष व सचिव शंकर (बाळा )अंकुश रावले (वय ५९) यांचे गुरुवार, दिनांक १८ सप्टेंबर रोजी प्रदीर्घ आजारानंतर मुंबई येथे निधन झाले.
ते निर्भीड व स्पष्टवक्ते वृत्तीचे म्हणून ओळखले जात. सरमळेवाडीच्या विकासकामात त्यांचे मोठे योगदान होते.
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, एक बहीण, काका व पुतणे असा परिवार आहे.

