*कोंकण एक्सप्रेस*
*न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेज फोंडाघाटच्या पाच विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड*
*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*
क्रीडा व युवक सेवा संचलनाय, महाराष्ट्र राज्य,पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद,सिंधुदुर्ग द्वारा आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे संपन्न झाल्या.या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटच्या खालील पाच विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.
*I)14 वर्ष वयोगट मुली*
1) कु.कृष्णाई नंदकिशोर रावराणे (46 किलो वजनी गट-प्रथम क्रमांक)
*II)17 वर्ष वयोगट मुली*
1) कु.ऋतुजा रुपेश चव्हाण
(46 किलो वजनी गट-प्रथम क्रमांक)
*III)17 वर्ष वयोगट मुले*
1) श्रीहरी सिद्धिविनायक गिरीबुवा (60 किलो वजनी गट-प्रथम क्रमांक)
*IV)17 वर्षे वयोगट मुले*
1) प्रथमेश अजित चिखले
(71 किलो वजनी गट-प्रथम क्रमांक )
*V)19 वर्ष वयोगट मुले*
1) सुरज राजन तिरोडकर
(57 किलो वजनी गट-प्रथम क्रमांक)
या सर्व विद्यार्थ्यांची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या सर्व विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षक श्री.ए.व्ही.पोफळे यांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी फोंडाघाटचे चेअरमन श्री.म.ज.सावंत, सेक्रेटरी श्री.चं.शा.लिंग्रस, खजिनदार श्री.वि.रा.तायशेटे, शाळा समिती चेअरमन श्री.द.दि.पवार,संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.प्रसाद कृ. पारकर, पर्यवेक्षक श्री.व्ही.पी.राठोड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी हार्दिक-हार्दिक अभिनंदन केले आणि विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

