शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख संदेश वरक यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख संदेश वरक यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा

*कोंकण एक्सप्रेस*

*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख संदेश वरक यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा*

*दोडामार्ग ः प्रतिनिधी*

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोडामार्ग उपतालुकाप्रमुख पदाचा संदेश वरक यांनी राजीनामा जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी व तालुकाप्रमुख संजय गवस यांना दिला आहे. कारण कि, गेल्या लोकसभा व विधानसभाच्या मतदानावेळी आमचे वरिष्ठ इतर पक्षांना मेनेज झालेले असतात. आता येवू घातलेल्या ग्रामपंचायत जिल्हापरिषद, पंचायत समिती ह्या वेळी हेच होणार आहे. त्यामुळे आपण आपल्या पदाला कार्यक्षमता देऊ शकत नाही. व लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही त्यामुळे फक्त प्रचार करायचा आणि आपला उमेदवार पराभूत होणार हे निश्चित असून त्या पदावर राहण आपल्याला पटत नाही. हे मला पद नको आणि त्या पदाला मी न्याय देऊ शकत नाही. म्हणून मी आजच माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. पण मी कायम माझा जीव असे पर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिक एक शिवसैनिक म्हणून कायम कार्यरत राहीन.

तरी माझ्या पदाचा राजीनामा पक्षाने तात्काळ मंजूर करावा हि विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!