आर्किटेक्चरनी प्लान तयार केल्यानंतरच कणकवली येथील प्राथमिक शाळा क्र ३ च्या प्रश्नाबाबत पुढील निर्णय

आर्किटेक्चरनी प्लान तयार केल्यानंतरच कणकवली येथील प्राथमिक शाळा क्र ३ च्या प्रश्नाबाबत पुढील निर्णय

*कोकण Express*

*आर्किटेक्चरनी प्लान तयार केल्यानंतरच कणकवली येथील प्राथमिक शाळा क्र ३ च्या प्रश्नाबाबत पुढील निर्णय*

*समीर नलावडेंची माहिती ; जिल्हाधिकार्‍यांच्या प्रमुख उपस्थितीत* बैठक संपन्न…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आर्किटेक्चरनी प्लान तयार केल्यानंतरच कणकवली येथील प्राथमिक शाळा क्र ३ च्या प्रश्नाबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, संबधित प्लान तयार झाल्यानंतर नागरीक विद्यार्थी शाळा बचाव समितीच्या सदस्यांना विश्वासात घेवूनच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहीती कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत आज येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

कणकवली प्राथमिक शाळा क्रमांक ३ स्थलांतरांबद्दल नगररचना विभागाचे आर्किटेक्चर येवून प्लान पाहणार आहेत. हा प्लान तयार झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती, शाळा बचाव संघर्ष समिती, भालचंद्र महाराज संस्थान,पालक,आजी-माजी विद्यार्थी यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल,असा निर्णय जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या समवेत गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली
येथील जिल्हाधिकारी दालनात याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ नितेश राणे, आ वैभव नाईक, नगराध्यक्ष समीर नलावडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, नगरसेवक सुशांत नाईक, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा बचाव संघर्ष समिती, भालचंद्र महाराज संस्थानचे श्री कामत,पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!