*कोकण Express*
*पालकमंत्री उदय सामंत यांचा उद्या सिंधुदुर्ग दौरा*
*सिंधुदुर्गनगरी,ता.०५:*
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
मंगळवार उद्या दुपारी १.५० वा. हेलिकॉप्टरने पोलीस परेड ग्राऊंड, ओरोस – सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने जिल्हा शासकीय रुग्णालय, ओरोस – सिंधुदुर्ग कडे प्रयाण, दु. २.०० वा. जिल्हा शासकीय रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी भेट व पाहणी, दुपारी २.३० वा. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी व इतर संबंधित अधिकारी यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे जिल्ह्यातील कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरणाबाबत आढावा तसेच कोरनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध संदर्भात आढावा बैठक. दुपारी ३.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे राखीव, दुपारी ३.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषद, दुपारी ४.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथून मोटारीने पोलीस परेड ग्राऊंड, ओरोस-सिंधुदुर्गकडे प्रयाण, सायं. ४.१५ वा. पोलीस परेड ग्राऊंड, ओरोस-सिंधुदुर्ग येथे आगमन व हेलिकॉप्टरने पुण्याकडे प्रयाण.

