*कोंकण एक्सप्रेस*
*ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची बैठक संपन्न*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सदर बैठकीमध्ये अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय ऑल इंडिया थल सैनिक कॅम सर्विस शूटिंग फायरिंग मध्ये सुवर्णपदक प्राप्त राष्ट्रीय स्तरावर कुमारी मनसे दिनेश फाले हिचा सर्वानुमते अभिनंदनचा ठराव घेण्यात आला. तसेच धनगर समाज भावनाकरिता आरक्षित भूखंड मिळवणे व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा मुख्यालया ठिकाणी किंवा शहराच्या ठिकाणी उभारणे करिता शासन स्तरावर प्रयत्न करणे या सभेमध्ये जिल्हाध्यक्ष विजय खरात यांनी जिथे धनगर वस्ती तेथे शाखा काढणार असे सांगितले तसेच यावेळी कार्यकारिणी निवड करण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष श्री नागेश रामचंद्र बोडेकर, देवगड तालुका अध्यक्ष श्री गोविंद सखाराम कोकरे, कणकवली तालुकाध्यक्ष श्री संजय सखाराम खरात यांची निवड करण्यात आली निवड हे जिल्हाध्यक्ष श्री विजय खरात यांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आली. या सभेचे आभारप्रदर्श श्री संजय खरात याने केले.

