महामार्गावर जाणवली येथे आयशर टेम्पो पलटी

महामार्गावर जाणवली येथे आयशर टेम्पो पलटी

*कोकण Express*

*महामार्गावर जाणवली येथे आयशर टेम्पो पलटी…*

*चालकाचे नियंत्रण सुटले ; टेम्पोचालक जखमी…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मुंबई-गोवा महामार्गावरील जाणवली रतांबीचा व्हाळ येथे आज आयशर टेम्पो पलटी झाला. सकाळी ८.३० वाजता ही घटना घडली. यात टेम्पोचालक जखमी झाला आहे.
भरधाव वेगाने मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. रतांबी व्हाळ येथे गेली काही वर्षे वारंवार अपघात होत आहेत. यात महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर अपघातांचे सत्र सुरूच आहे. आज झालेल्या अपघातातील टेम्पोचालकाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात MH 02 ER/8591 या टेम्पोचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस प्रकाश गवस व सुनील निकम यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!