*कोकण Express*
*ओटीपी नं विचारून 1 लाख 63 हजार ला गंडा ; निरवडेतील घटना*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
बँक मधून बोलतो आहे असे सांगून ओटीपी क्रमांक विचारून तब्बल 1 लाख 63 हजार 216 रुपयांचा गंडा निरवडे येथील एकाला घातला. मोईन मुबारक नाईक असे फसवणूक झाल्याचे नाव असून याबाबत येथील पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात सायबर क्राईम ऍक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.