*प्रा. हरिभाऊ भिसे यांना राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार जाहीर*

*प्रा. हरिभाऊ भिसे यांना राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार जाहीर*

*कोंकण एक्सप्रेस 

*प्रा. हरिभाऊ भिसे यांना राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार जाहीर*

*कणकवली ः प्रतिनिधी*

येथील प्रसिद्ध कलावंत व शाहीर प्रा.हरिभाऊ भिसे यांना कोल्हापूर येथील मानवतावादी सांस्कृतिक चळवळ व दीक्षा फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे.
प्रा. हरिभाऊ भिसे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केलेल्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रविवारी 29 जून 2025 रोजी 12.30 वाजता राजर्षी शाहू सांस्कृतिक भवन कोल्हापूर येथे आयोजित एका खास समारंभात प्राध्यापक हरिभाऊ भिसे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मानाचा कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह मानपत्र, राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा आणि अकरा हजार रुपयाची ग्रंथ संपदा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्राध्यापक हरिभाऊ भिसे हे नुकतेच कणकवली महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले असून अक्षर सिंधू साहित्य कला मंच सिंधुदुर्ग, सिंधुगर्जना ढोल ताशा पथक कणकवली, कणकवली अर्बन निधी बँक, ज्ञानदा शिक्षण संस्था संस्थापक आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे, आयडियल नर्सिंग anm/g nm स्कूल कणकवली, वृद्ध कलाकार व साहित्त्यिक मानधन समिती सिंधुदुर्ग चे उपाध्यक्ष, रोटरी क्लब चार्टर मेंबर, सिंधुदुर्ग दक्षता समिती सदस्य,रंगखांब ग्रुप कणकवली, शाहिरी लोक कला गोंधळ लोककला मंच अशा विविध संस्थांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाज प्रबोधन कार्यात व लोककला जपण्यात त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.
प्रा. हरिभाऊ भिसे यांच्या सर्वांगीण कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेल्याबद्दल जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, प्रशासकीय व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!