*कोंकण एक्सप्रेस*
*ना. नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त नांदगावात संघर्षमय नाट्यप्रयोग “वीर बब्रुवाहन” प्रयोगाला झाली हाऊसफुल्ल गर्दी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगावात महापुरुष मधली सभागृह येथे नांदगाव विभागाच्या वतीने संघर्षमय “वीर बब्रुवाहन” नाट्यप्रयोगाला हाऊसफुल्ल गर्दी झाली.
नाट्यप्रयोग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण पिढीतील नावलौकिक प्राप्त अभ्यासू कलाकारांच्या संयुक्त संचात महान पौराणिक संघर्षमय नाट्यप्रयोग “वीर बब्रुवाहन ” हा सादर केला .
श्रीफळ वाढवून उद्घाटन कणकवली विधानसभा मतदारसंघांचे प्रमुख मनोज रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे तालुकासरचिटणीस पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, महिला मंडळ च्या तालुकाध्यक्षा सौ. हर्षदा वाळके, हेमंत परुळेकर, हनुमंत वाळके, रविंद्र तेली , बापू फाटक, संतोष जाधव, नाना सामंत , कमलेश पाटील, संदेश मेस्त्री, संतोष पाटील, सचिन पाटील , उध्दव कांडर , पांडू मयेकर, आदी बहुसंख्येने कार्यकर्ते पदाधिकारी तसेच नाट्य रसिक उपस्थित होते.