*देवगड तालुक्यात पावसामुळे गिर्ये व नवानगर येथील दोन घरांवर झाड पडून नुकसान*

*देवगड तालुक्यात पावसामुळे गिर्ये व नवानगर येथील दोन घरांवर झाड पडून नुकसान*

*कोंकण एक्सप्रेस*

*देवगड तालुक्यात पावसामुळे गिर्ये व नवानगर येथील दोन घरांवर झाड पडून नुकसान*

*प्रशांत वाडेकर, देवगड*

देवगड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पडलेल्या पावसामुळे दोन घरांवर झाडे कोसळून घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात बुधवारी सकाळी ८ वा. ५३ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे.

यामध्ये नवानगर ठाकूरवाडी येथील फैजा रियाझ भाटकर व असिया खम्सू भाटकर यांच्या घरावर झाड पडून घराचे नुकसान झाले आहे. तसेच गिर्ये येथील अरविंद कृष्णा घाटये यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले आहे. दोन्ही ठिकाणी झालेल्या नुकसानीची तलाठी यांच्यामार्फत पंचयादी सुरु आहे, अशी माहिती देवगड तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!