शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ‘स्वच्छ वेंगुर्ला दौड‘

शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ‘स्वच्छ वेंगुर्ला दौड‘

*कोंकण एक्सप्रेस*

*शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ‘स्वच्छ वेंगुर्ला दौड‘*

*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*

महाराष्ट्रातील सर्वात जुन्या नगरपरिषदांपैकी एक असा लौकिक असलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्थापनेस २५ मे २०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण होत आहेत. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणा-या वेंगुर्ला नगरपरिषदेने वर्षानुवर्षे शहराच्या विकासासोबत स्वच्छतेतून समृद्धीकडे सातत्याने वाटचाल केलेली आहे. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत २५ मे रोजी ‘स्वच्छ वेंगुर्ला दौड‘ आयोजित करण्यात आली आहे.

या उपक्रमांतर्गत १५ कि.मी. खुली मॅरेथॉन स्पर्धा (पुरुष व महिला)

तसेच ५ कि.मी.खुली हौशी मॅरेथॉन (फन रन) (पुरुष व महिला) घेण्यात येणार आहे. खुली मॅरेथॉन (१५ कि.मी.) ही घोडेबाव गार्डन-अग्निशमन केंद्र – मल्टीपर्पज हॉल-तहसिल कार्यालय – फळ संशोधन केंद्र – रामघाट रोड – स्वच्छ भारत पर्यटन स्थळ-पावर हाऊस मार्गे-रामेश्वर मंदिर – पिराचा दर्गा – वेंगुर्ला बस स्थानक -मानसीश्वर उद्यान मार्गे नवाबाग – झुलता पुल – वेंगुर्ला बंदर – दाभोली नाका -नगरपरिषद कार्यालय व मार्केट – हॉस्पिटल नाका – त्रिवेणी उद्यान – घोडेबाव उद्यान या मार्गावर धावणार आहे. यासाठी इच्छुकांनी २५ रोजी सकाळी ५.३० वा. घोडेबाव गार्डन येथे उपस्थित रहावे. स्पर्धा ६ वा. सुरू होणार आहे. स्पर्धेची नावनोंदणी ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. १७ मेपर्यंत इच्छुकांनी नावनोंदणी करावी. नोंदणी शुल्क ३०० रूपये ठेवण्यात आले आहे. २० मे पर्यंत ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करणा-या स्पर्धकांना ४०० रूपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. २० मे नंतर कोणत्याही प्रकारे नोंदणी घेतली जाणार नाही. स्पर्धेत भाग घेणा-यांना टीशर्ट तसेच स्पर्धा पूर्ण करणा-यांना मेडल व प्रमाणपत्र देण्यात येतील. पहिल्या तीन विजेत्यांना (३ पुरूष व ३ महिला) अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार अशी बक्षिसे देण्यात येतील.

५ कि.मी.खुली हौशी मॅरेथॉन (फन रन) ही घोडेबाव गार्डन – पावर हाऊस मार्गे – रामेश्वर मंदिर – पिराचा दर्गा – दाभोली नाका – नगरपरिषद कार्यालय व मार्केट – हॉस्पिटल नाका – त्रिवेणी उद्यान – घोडेबाव उद्यान या मार्गावर धावणार आहे. या स्पर्धेसाठी २५ मे रोजी सकाळी ६.३० वा. घोडेबाव गार्डन येथे उपस्थित रहावे. स्पर्धा सकाळी ७ वाजता सुरु होईल. स्पर्धेची नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. नोंदणीची अंतिम दि. २० मे आहे. नोंदणी शुल्क ५० रूपये ठेवण्यात आले आहे. २२ मे पर्यंत ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करणा-या स्पर्धकांना १००/- रूपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. २२ मे नंतर कोणत्याही प्रकारे नोंदणी केली जाणार नाही. या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणा-यांना टोपी व प्रमाणापत्र देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेच्या बाबतीत अधिक माहितीसाठी नगरपरिषदेचे कर्मचारी गणेश कांबळे (९६६५८५६५३०) किवा स्वप्नील कोरगावकर (८८८८४३००८९)यांच्याशी संफ साधावा. स्पर्धेसाठी नोंदणी करण्याची लिंक https://forms.gle/2oYXH2WQoFqL75Zp7अशी राहील. जास्तीत जास्त स्वच्छताप्रेमी स्पर्धकांनी व नागरीकांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!