*कोंकण एक्सप्रेस*
*संजू हुले यांच्या वाळूशिल्पांचे मोफत प्रदर्शन*
*उत्कृष्ट वाळूशिल्पांना पर्यटकांकडून दाद*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
युवा वाळू शिल्पकार संजू हुले यांनी शहरातील झुलता पूल नजिकच्या जलबांदेश्वर गार्डन येथे एकूण ९ वाळूशिल्पे साकारली आहेत. या वाळूशिल्पांचे प्रदर्शन १८ एप्रिलपासून सुरू झाले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत आहे.
वेंगुर्ला-दाभोसवाडा येथील संजू हुले हे गेली १५ वर्षे विविध प्रकारची वाळू शिल्पे साकारत आहेत. दरम्यान, मागील ११ दिवसांत त्यांनी जलबांदेश्वर गार्डन येथे गणपती, छत्रपती शिवाजी महाराज, क्रिकेटपटू एम. एस.धोनी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, उद्योगपती रतन टाटा, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम, हिदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वच्छतेचे जनक संत गाडगेबाबा इत्यादी ९ वाळू शिल्पे जलदगतीने साकारली आहेत. यासाठी त्यांना वेंगुलाग् नगरपरिषदेचे सहकार्य लाभले आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान ६.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अंतर्गत हे वाळू शिल्प प्रदर्शन मे महिन्यापर्यंत सर्वांसाठी मोफत असणार आहे. याठिकाणी येणारे पर्यटक ही वाळूशिल्पे पाहून हुले यांचे कौतुक करीत आहेत.