*कोंकण एक्सप्रेस*
*निराधार महिलेचा महाराष्ट्र दिनी उपोषणाचा इशारा*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
गेली तीन वर्षे सातत्याने माझ्यासारख्या निराधार महिलेला नाहक त्रास देणा-या ‘त्या‘ पाचहीजणांवर कोणतीही कारवाई होत नाही. यांचा निषेध म्हणून महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत उपोषण करणार आहे, असा इशारा वेंगुर्ला-भटवाडी येथील रहिवासी वनिता मांजरेकर यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविले आहे.
‘त्या‘ पाचही जणांविरोधात आपण अनेकवेळा तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. चॅप्टर केसही झाली. पोलिसांच्या सूचनेनुसार, महत्प्रयासाने आपण कोर्टातही दावा दाखल केला आहे. तरीही आपल्याला धमकावणे व मारहाणीचा प्रयत्न करण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. त्यामुळे नाईलाजाने आपण हा निर्णय घेतला असल्याचे मांजरेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.