*ऑलम्पिक पदकाचा पाया रचन्याचे काम खऱ्या अर्थाने शारीरिक शिक्षण शिक्षकच करतात: क्रीडा उपसंचालक सुहास पाटील*

*ऑलम्पिक पदकाचा पाया रचन्याचे काम खऱ्या अर्थाने शारीरिक शिक्षण शिक्षकच करतात: क्रीडा उपसंचालक सुहास पाटील*

*कोंकण एक्सप्रेस*

*ऑलम्पिक पदकाचा पाया रचन्याचे काम खऱ्या अर्थाने शारीरिक शिक्षण शिक्षकच करतात: क्रीडा उपसंचालक सुहास पाटील*

*शिर्डीतील शारीरिक शिक्षण शिक्षक क्रीडा महाअधिवेशनाच्या समारोप कार्यक्रमात प्रतिपादन*

*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*

ऑलिम्पिक पदकाचा पाया रचण्याचे काम खऱ्या अर्थाने शारीरिक शिक्षण शिक्षकच करतात.याशिवाय शारीरिक शिक्षण हा प्रत्येक माणसाच्या जीवनातील अविभाग्य घटक आहे. प्रत्येक शाळेत शारीरिक शिक्षण विषय हा अधोरेखित राहिला हवा,त्यासाठी क्रीडा शिक्षकाची भुमिका फार महत्त्वाची ठरते.म्हणून इतर विषयांबरोबरच शारीरिक शिक्षण हाही विषय बहुमोलाचा आहे.गेली अनेक वर्ष शारीरिक शिक्षकांची भरतीच न झाल्यामुळे शारीरिक शिक्षकांचा वर्ग हळूहळू लोप पावत चालला आहे खंत याप्रसंगी त्यांनी व्यक्त केली. भविष्यात विषयाला वेगळीच दिशा देण्यासाठी आपणा सर्वांना अभ्यासपूर्ण व एकजुटीने काम करावे लागेल असे आवाहन क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी शिर्डीतील अधिवेशन समारोप प्रसंगी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर अशोक दुधारे, विभागीय सचिव मच्छिंद्र कदम, शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती अध्यक्ष विश्वनाथ पाटोळे,शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर , समन्वय समितीचे सरचिटणीस ज्ञानेश काळे,संजय पाटील शिवदत्त ढवळे, सहसचिव डॉ.जितेंद्र लिंबकर,डॉ.आनं पुढेद पवार,प्रीतम टेकाडे, संजय चव्हाण,अमोल जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.
.
*ऑलम्पिक क्रीडा प्रकारांना विशेष सवलती व प्रोत्साहन द्यावे:अशोक दुधारे*

ऑलिंपिक क्रीडा प्रकारांना विशेष सवलती आणि प्राधान्य प्रोत्साहन द्यावे त्यामुळे बहुतेक खेळाडू या खेळाकडे वळतील आणि भारताला जास्तीत जास्त पदके मिळतील, खऱ्या अर्थाने जर आपले खेळाडू ऑलिंपिक पर्यंत जायचे असतील तर आपणाला विविध खेळांच्या संघटना त्या त्या खेळातील तज्ञ शिक्षकांच्या हातात द्यायला हव्यात. क्रीडा शिक्षकांच्या उत्कृष्ट कामामुळे आज महाराष्ट्र राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल स्थानी आहे असे गौरवोद्गार शिवछत्रपती अवॉर्ड विजेते अशोक दुधारे याप्रसंगी काढले.
या क्रीडा महाअधिवेशनात 17 ठराव मांडण्यात आले आणि त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

*क्रीडा शिक्षक व पत्रकार दत्तात्रय मारकड यांचा सत्कार*

याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांचा क्रीडा क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल व उत्कृष्ट क्रीडा पत्रकारिता बद्दल पुणेचे उपसंचालक सुहास पाटील व शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे यांच्या शुभहस्ते शाल,सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी इतर क्रीडा पत्रकारांचाही गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
क्रीडा महाअधिवेशन अतिशय यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल राजेंद्र कोतकर, विश्वनाथ पाटोळे,ज्ञानेश काळे व शिवदत्त ढवळे यांचा राज्यातील शारीरिक शिक्षण शिक्षकांच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला.अधिवेशन यशस्वी करण्यासाठी राज्यभरातून आलेल्या शिक्षकांचे आयोजक समितीच्यावतीने विशेष धन्यवाद देऊन आभार मानण्यात आले.
समारोप कार्यक्रमात विभागीय संचालक मच्छिंद्र कदम, स्वाती टेमकर, विश्वनाथ पाटोळे, शिवदत्त ढवळे आदींनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कोहकडे तर आभार ज्ञानेश काळे यांनी मानले. या कार्यक्रमास पुरुषोत्तम उपर्वट, राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर डॉ जितेंद्र लिंबकर, बी.डी. जाधव, डॉ आनंद पवार, राजेश जाधव, प्रशांत कोल्हे, प्रितम टेकाडे आदी उपस्थित होते.
अधिवेशन यशस्वी होण्यासाठी संजय पाटील, अमोल जोशी, स्वप्निल कर्पे, सुनिल गागरे, नंदकुमार शितोळे, अजित वडवकर, ज्ञानेश्वर भोत, रावसाहेब करंजुले, बबन लांडगे, अजित कदम, महेश कोल्हे, पवन खोडे, किशोर राजगुरू, किरण हंगेकर, काकासाहेब चौधरी, कुंडलिक शिरोळे,
यांच्या सह अनेक शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

अधिवेशन आयोजनासाठी डॉ जितेंद्र लिंबकर (मुंबई), संजय पाटील (नाशिक), बी.डी. जाधव (नांदेड), विश्वनाथ पाटोळे (पुणे), ज्ञानेश काळे (सातारा), तायप्पा शेंडगे (सातारा), स्वप्नील जोशी (नाशिक) आदींनी रोख स्वरूपात मदत केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!