*शिरगाव येथे शनिवारी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा*

*शिरगाव येथे शनिवारी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा*

*कोंकण एक्सप्रेस*

*शिरगाव येथे शनिवारी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा*

*यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*

*शिरगाव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील शिरगाव येथील श्री हनुमान सेवा मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री हनुमान मंदिरात शनिवार, दि. १२ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने भक्तिभावाने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६.१५ वाजता श्री हनुमान जन्म, पूजा व आरतीने होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १ वाजता महाप्रसाद आणि सायंकाळी ५ वाजता पालखी मिरवणूक पार पडणार आहे.रात्री ९.३० वाजता रंगतदार २०-२० डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार असून, हा सामना बुवा कु. भारती पाळेकर (श्री देव मालोबा प्रासादिक महिला भजन मंडळ, पाळेकरवाडी, ता. देवगड) विरुद्ध बुवा कु. अंकिता गावडे (श्री अष्टविनायक प्रासादिक महिला भजन मंडळ, साळेल, ता. मालवण) यांच्यात रंगणार आहे.
या भजन सामन्यात पखवाज, तबला व संगीत अलंकार यांच्या संगतीने भक्तिरसात न्हालेलं वातावरण निर्माण होणार आहे.या कार्यक्रमांचे आयोजन श्री हनुमान सेवा मंडळ, शिरगाव यांच्या वतीने करण्यात आले असून, सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय वातावरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!