*अणसूर दाडोबाचा सुवर्ण कलशारोहण सोहळा*

*अणसूर दाडोबाचा सुवर्ण कलशारोहण सोहळा*

*कोंकण एक्सप्रेस*

*अणसूर दाडोबाचा सुवर्ण कलशारोहण सोहळा*

 *खालचे अणसूर येथील श्री देव दाडोबा सुवर्ण कलशारोहण सोहळा दि. १३ ते १४ एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

दि. १२ रोजी सकाळी १० वा. श्री देव दाडोबा प्रवेशद्वाराचे उद्घाटन, सायं.४ वा. प्रायश्चित विधी, ५ वा. स्थानिक महिलांच्या लेझिम पथकासह शिखर कलशाचे सवाद्य मिरवणूकीने आगमन, सायं.७.३० वा. मंदिरात आरती, दि. १३ रोजी सकाळी ७.३० ते १.३० पर्यंत गणपती पूजन, मंगलाचरण, देवतांना आमंत्रण, सामुदायिक प्रार्थना, संप्रोक्षण विधी, होम, मंत्रपुष्पांजली, आरती, दुपारी २ वा. महाप्रसाद, सायं.६ वा. स्थानिक मंडळांची भजने, रात्रौ ८ वा. कलेश्वर दशावतार (भाई कलिगण) मंडळाचे नाटक, दि.१४ रोजी सकाळी ७.३० वा. मंगलाचरण, आवाहित देवता पूजन, सकाळी १०.५५ वा. शिखर कलश प्रतिष्ठापना, शिखर कलश स्नपन होम, हरिहर यागांगभूत सुक्त, मंत्रपुष्पांजली, दुपारी २ वा. महाप्रसाद, सायं.६ वा. स्थानिकांची भजने, रात्रौ ९ वा. पालखी प्रदक्षिणा, रात्रौ १० वा. स्थानिकांचे सांस्कृतिक कार्यक्रम, दि. १५ रोजी सकाळी ७.३० ते १२.३० पर्यंत मंगलाचरण, आवाहित देवता पूजन, हरिहरयाग, बलिदान, पूर्णाहूती, श्रेयोदान, सामुदायिक प्रार्थना, मंत्रपुष्पांजली, आरती, दुपारी १.३० वा. महाप्रसाद, सायं.६ वा. स्थानिकांची भजने, रात्रौ ८ वा. महिलांची फुगडी, रात्रौ ९ वा. वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. तरी भाविकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव दाडोबा ग्रामसमिती आणि श्री देव दाडोबा समितीतर्फे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!