नांदोस गड भविष्यातील एक प्रेरणा स्त्रोत बनवूया उपसरपंच विजय निकम

नांदोस गड भविष्यातील एक प्रेरणा स्त्रोत बनवूया उपसरपंच विजय निकम

*कोंकण एक्सप्रेस*

*नांदोस गड भविष्यातील एक प्रेरणा स्त्रोत बनवूया उपसरपंच विजय निकम*

*मालवण ः प्रतिनिधी*

नांदोस गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक नांदोस गडाचे संवर्धन करून त्याला ऊर्जितावस्था आणून देऊन भविष्यातील सर्वांचे प्रेरणास्त्रोत बनवूया असे उद्गार नांदोस गावचे उपसरपंच श्री विजय निकम यांनी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संयुक्त कट्ट्याच्या विद्यार्थ्यांचे समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित नांदोस क्षेत्रभेट च्या निमित्ताने काढले.
या वेळी मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा तंटामुक्ती अध्यक्ष श्री हेमंत माळकर यांनी गड किल्ल्याविषयी माहिती देताना नांदोस गावातील मंडळीच्या तसेच आजूबाजूच्या परिसरातील मान्यवरांच्या सहकार्याने भविष्यातील एक प्रेरणास्रोत बनविण्याचा मानस बोलून दाखविला.यावेळी ऐतिहासिक संदर्भाचे दाखले देऊन विद्यार्थ्या मध्ये जाणिव जागृती केली.
श्री चंद्रसेन पाताडे प्राथमिक शाळा नांदोस गावकरवाडी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना या गढी विषयी चे ऐतिहासिक संदर्भ सांगून माहिती दिली.शालेय समिती अध्यक्ष श्री सुधीर वराडकर यांनी गढी विषयी ऐतिहासिक व आध्यात्मिक संदर्भ देत माहिती दिली.सिंधुदुर्गातील किल्ल्याविषयी माहिती देताना नांदोस किल्ल्याविषयी चे महत्व मावळा प्रतिष्ठान चे सदस्य श्री कमलेश चव्हाण यांनी विशद केले.तसेच या विषया संदर्भात विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.
या वेळी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संयुक्त कट्टा चे इयत्ता 5वी ते 12वी तसेच प्राथमिक शाळा नांदोस गावकरवाडी च्या विद्यार्थ्यांनी गडावर स्वच्छता मोहीम राबविली व गड किल्ले संदर्भातील माहिती जाणून घेतली.
या वेळी पर्यवेक्षक श्री महेश भाट समाजशास्त्र प्रमुख श्री एकनाथ राऊळ प्रशालेतील सर्व शिक्षक,नांदोस मावळा प्रतिष्ठान चे सदस्य तसेच नांदोस मधील नागरिक श्री.भिकाजी गावडे,राजू गावडे,श्री,प्रमोद गावडे,शैलेश बिबवणेकर,अमोल नांदोसकर,विठ्ठल गावडे तसेच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
ऐतिहासिक किल्ले संवर्धन संदर्भात शाळा स्तरावरील कृती कार्यक्रमाच्या संदर्भात केल्या जाणाऱ्या कार्या बद्दल मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे यांनी सकारात्मक भूमिका मांडत क्षेत्रभेट यशस्वी करण्यासंदर्भात समाधान व्यक्त केले.
ऐतिहासिक किल्ले संवर्धन व प्रसारा संदर्भात कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर विश्वस्त कर्नल श्री.शिवानंद वराडकर ॲड श्री.एस एस पवार उपाध्यक्ष श्री.आनंद वराडकर श्री.शेखर पेणकर सचिव श्री.सुनील नाईक श्रीमती विजयश्री देसाई खजिनदार श्री.श्याम पावसकर सहसचिव श्री.साबाजी गावडे इतर संचालक या उपक्रमास विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच आपल्या परिसरातील ऐतिहासिक ठेव्या विषयी विद्यार्थ्या मध्ये जाणिव जागृती व्हावी यासाठी क्षेत्रभेटी ना प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांबद्दल आशावाद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!