लक्झरी बस मधील प्रवासी तरुणीच्या विनयभंग प्रकरणी सहचालक निर्दोष*

लक्झरी बस मधील प्रवासी तरुणीच्या विनयभंग प्रकरणी सहचालक निर्दोष*

*कोंकण एक्सप्रेस*

*लक्झरी बस मधील प्रवासी तरुणीच्या विनयभंग प्रकरणी सहचालक निर्दोष*

*कणकवली ः प्रतिनिधी*

गोवा ते मुंबई जाणाऱ्या स्लिपर लक्झरी बसमधील प्रवासी तरूणींचा वैभववाडी-करूळ चेकपोष्ट येथे व बसमध्ये विनयभंग केल्याप्रकरणी बस सहचालक बाबुशा फकिर नदाफ रा. ओसरगांव याची सह प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम . बी. सोनटक्के यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

जानेवारी २०२२ मध्ये मुंबईस्थित तरूणी ही म्हापसा येथून ठाणे येथे लक्झरी बसने प्रवास करत होती. वैभववाडी-करूळ चकपोष्ट येथे तपासणीसाठी गाडी थांबली असता सदर तरूणी वॉशरूमसाठी बसबाहेर उतरली. त्यावेळी तीला वॉशरूम जागा दाखविण्याच्या बहाण्याने तीचा विनयभंग केला. तद्नंतर पुढील प्रवासात तरूणी झोपलेल्या ठिकाणी देखील येऊन सहचालकाने विनयभंगाची कृत्ये केली. तसेच आरोपीने तिला माझी शीट खाली आहे आपण एकत्र प्रवास करू असे सांगितले. याप्रकरणी सदर तरूणीने आपल्या मोबाईलवरून नातेवाईक व मित्रांना घटनेचे मेसेज पाठविले. तीच्या भावाने बुकींग केलेल्या लक्झरी ट्रॅव्हल्सशी संपर्क साधला. त्यानुसार आरोपीची ओळख निश्चित झाली. त्यानंतर घरी पोहोचल्यावर तरुणींने मुंब्रा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर भादवि कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करून तपासासाठी वैभववाडी पोलीसांकडे पाठविण्यात आला. यात एकूण चार साक्षीदार तपासले. फिर्यादीने सदर घटनेवेळी पोलीस तपासणीमध्ये तीच्याकडे दोन गोवा बनावटीच्या दारूच्या दोन बाटल्या विनापरवाना वाहतूक करताना आढळून आल्या, असे सुनावणीत स्पष्ट झाले. तसेच फिर्याद दाखल करण्यास झालेला विलंब, कोणताही ठोस पुरावा न आल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!