*राष्ट्रीय लोकअदालतीतमध्ये ३२ प्रकरणे निकाली*

*राष्ट्रीय लोकअदालतीतमध्ये ३२ प्रकरणे निकाली*

*कोंकण एक्सप्रेस*

*राष्ट्रीय लोकअदालतीतमध्ये ३२ प्रकरणे निकाली*

*प्रशांत वाडेकर , देवगड*

उच्च न्यायालय, मुंबई, राज्य विधी सेवा प्राधिकरण-मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग- ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून येथील दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर येथे आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्‌घाटन दिवाणी न्यायाधीश तथा देवगड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते झाले. सन २०२५ मधील ही पहिली राष्ट्रीय लोकअदालत होती.
या राष्ट्रीय लोकअदालतीत दिवाणी व फौजदारी खटले तसेच वादपूर्व प्रकरणे अशा ७२३ पैकी एकूण ३२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून १८ लाख ९२ हजार २४२ रुपये इतकी वसुली झाली. देवगड तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व ज्येष्ठ व कनिष्ठ विधीज्ञ व दिवाणी न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार, बँकांचे अधिकारी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी आदी उपस्थित होते. या लोकअदालतीत दिवाणी व फौजदारीकडील एकूण ४८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील २३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून १७ लाख १७ हजार ६०० रुपये वसुली झाली. बँक, महावितरण यातील ६७५ वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील ९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून एकूण एक लाख ७४ हजार ६४२ रुपये वसुली झाली. पॅनेल सदस्य म्हणून अँड. आशिष लोके यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!