रामेश्वर वाचन मंदिर आचरे आयोजित होम मिनिष्टर स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या त्या विशाखा भाटकर

रामेश्वर वाचन मंदिर आचरे आयोजित होम मिनिष्टर स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या त्या विशाखा भाटकर

*कोंकण एक्सप्रेस*

*रामेश्वर वाचन मंदिर आचरे आयोजित होम मिनिष्टर स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या त्या विशाखा भाटकर*

*मालवण : प्रतिनिधी*

श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा तर्फे आयोजित होममिनिष्टर स्पर्धेत विशाखा भाटकर या पैठणीच्या मानकरी ठरल्या तर उपविजेत्या सौ मधुरा परब यांना सोन्याची नथ देवून गौरविण्यात आले. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या आचरे येथील रामेश्वर वाचन मंदिराने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपल्या महिला सभासदांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित केली होती. सदर स्पर्धेत ३२ स्पर्धकांना सहभाग देण्यात आला होता.

विजेत्यांना संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, सौ उर्मिला सांबारी, श्रीमती वैशाली सांबारी, भिकाजी कदम,सौ दिपाली कावले पुरस्कर्ते नेहा नलावडे, कामिनी ढेकणे, वर्षा सांबारी, भावना मुणगेकर सौ श्रद्धा महाजणी, विलास आचरेकर यांसह सौ. उर्मिला सांबारी, सौ अंजली बापर्डेकर,सीमा घुटुकडे, प्रणया टेमकर, सई राणे, सुमित्रा गुरव, वैशाली सांबारी, अस्मिता गवस, रक्षिता शानभाग, गीता खेडेकर,नेहा घाडी, स्वाती पेडणेकर, शोभा सुखटणकर, गीता नायर, मानसी राणे, अंजली राणे, स्मिता परब, वैशाली देसाई आदी व इतर उपस्थित होते

कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक सांस्कृतिक समिती सदस्या सौ. वर्षा सांबारी यांनी तर आभार सौ. भावना मुणगेकर यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल सौ. विनिता कांबळी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!