मालवणच्या भंडारी ए सो कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवणच्या भंडारी ए सो कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवणच्या भंडारी ए सो कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद*

*मालवण : प्रतिनिधी*

मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी(मालवण) मुंबई संचलित भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय मालवण व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारी ए सो कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्त भंडारी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, मालवण येथे आयोजित करण्यात आलेल्या मालवण तालुकास्तरीय शालेय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उत्साहात संपन्न झालेल्या या स्पर्धेत मालवण तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेचे उदघाटन भंडारी एज्युकेशन सोसायटीचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, लोकल कमिटीचे दशरथ कवटकर, मुख्याध्यापक हणमंत तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, प्राध्यापक पवन बांदेकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, माजी विद्यार्थी हेमंत शिरगांवकर भूषण मेतर आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रा. बांदेकर यांनी प्रस्ताविक केले.

यावेळी साबाजी करलकर यांनी भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्याचा उपक्रम स्तुत्य आहे, मुलांनी आपल्या कल्पना शक्तीला चालना देत चित्र रेखाटून आपल्यातील कलेचे दर्शन घडवावे, असे सांगत शुभेच्छा दिल्या. तर वामन खोत यांनी चित्रकला हा मुलांचा आवडीचा विषय असून अशा स्पर्धामधून मुलांना कला सादर करण्याची संधी मिळते असे सांगितले

सूत्रसंचालन ऍड. प्रथमेश सामंत यांनी केले तर आभार श्री. बनसोडे यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी स्पर्धा सहप्रमुख शुभम मेस्त्री, भूषण मेतर, ललित चव्हाण, ऍड. प्रथमेश सामंत, राहुल तारी, पंकज गावडे, प्रवीण पवार, सागर जाधव, मिताली कांदळगावकर, पार्थ मेस्त्री,पायल, हर्षद, तन्वी, यश, प्रतीक, शेर्लेकर मॅडम, इंगळे मॅडम तसेच कॉलेजचे विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचा निकाल ४ मे रोजी माजी विद्यार्थी मेळाव्यात जाहीर करण्यात येणार आहे. यावेळी विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!