*कोंकण एक्सप्रेस*
उभादांडा येथील गणपतीचे विसर्जन
वेंगुर्ला : प्रथमेश गुरव
उभादांडा येथील गणपती मंदिरात स्थानापन्न असलेल्या श्री गणपतीच्या मूर्तीचे रविवारी रात्री सागरेश्वर किनारी ढोल ताशे, बॅन्जो आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात विसर्जन करण्यात आले. यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते. या गणपतीच्या विसर्जनापूर्वी शनिवारी मंदिरात म्हामण्याचा कार्यक्रम झाला. हजारो भाविकांनी या म्हामण्याचा लाभ घेतला.

