विलवडे ग्रा पं डाटा ऑपरेटर कृष्णा सावंत यांचे आकस्मिक निधन

विलवडे ग्रा पं डाटा ऑपरेटर कृष्णा सावंत यांचे आकस्मिक निधन

*कोकण Express*

*विलवडे ग्रा पं डाटा ऑपरेटर कृष्णा सावंत यांचे आकस्मिक निधन*

*बांदा  ः प्रतिनिधी*

विलवडे-टेंबवाडी येथील कृष्णा सोमा सावंत (वय ३०) या युवकाचे गोवा-बांबोळी येथे उपचारादरम्यान सोमवारी रात्री उशिरा निधीन झाले. कृष्णाला सहा दिवसांपूर्वी उलट्या होत असल्याने गुरुवारी त्याला उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा त्रास कमी होत नसल्याने त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे खासगी दवाखान्यात हलविण्यात आले होते. मात्र तरीही त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अधिक उपचारासाठी बांबोळी येथे नेण्यात आले होते. तेथेही त्याची प्रकृती उपचारांना साथ देत नव्हती. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर सोमवारी रात्री उशिरा त्याची प्राणज्योत मालविली.
कृष्णा हा विलवडे ग्रामपंचायत कार्यालयात डाटा ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. मितभाषी, प्रामाणिक व कष्टाळू युवक अशी त्याची परिसरात ओळख होती. त्याच्या अकाली निधनाची बातमी समजताच विलवडे गावावर शोककळा पसरली. माजी उपसभापती विनायक दळवी, परेश दळवी यांनी गोवा येथे धाव घेतली. कृष्णाच्या आजाराचे नेमके निदान होऊ शकले नाही. त्याच्या मागे आई-वडील, दोन भाऊ, बहिण असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!