*कोंकण एक्सप्रेस*
*सावंतवाडीत घे भरारी फाऊंडेशनच्या वतीने “खेळ पैठणीचा” कार्यक्रम…*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
येथील घे भरारी फाऊंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी “खेळ पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ७ मार्चला सायं. ५ ते १० वाजेपर्यंत येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे होणार आहे. यामध्ये प्रथम विजेत्याला पैठणी साडी, द्वितीय व तृतीय विजेत्यांना आकर्षक साडी पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे. तसेच लकी ड्रॉ व फनी गेम्स देखील ठेवण्यात आले आहेत.
तरीही या कार्यक्रमात जास्तीत-जास्त महिलांनी सहभागी ह्यावे, असे आवाहन अध्यक्षा गौरी सावंत, उपाध्यक्ष शारदा गुरव, संस्थापक अध्यक्षा मोहिनी मडगांवकर, खजिनदार मेघना साळगांवकर, कार्याध्यक्षा रिया रेडिज, सचिव मेघनी राऊळ यांनी केले आहे.