विद्यामंदिर माध्यामिक प्रशाला,कणकवलीमध्ये संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली*

विद्यामंदिर माध्यामिक प्रशाला,कणकवलीमध्ये संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली*

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर माध्यामिक प्रशाला,कणकवलीमध्ये संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली*

*कणकवली ः प्रतिनिधी*

महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक व संत गाडगेबाबा प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून यांची आज जयंती विद्यामंदिर प्रशालेत साजरी करण्यात आली. यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. अच्युतराव वनवे यांनी संत गाडगेबाबा यांच्याबद्दल माहिती दिली.गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी ।” असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. “देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका.” अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
“संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश ”
गाडगेबाबा प्रबोधन काव्य
भुकेलेल्यांना = अन्न
तहानलेल्यांना = पाणी
उघड्यानागड्यांना = वस्त्र
गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
बेघरांना = आसरा
अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार
बेकारांना = रोजगार
पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय
गरीब तरुण-तरुणींचे = लग्न
दुःखी व निराशांना = हिंमत
गोरगरिबांना = शिक्षण
हाच आजचा रोकडा धर्म आहे! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!
त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासनाने अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे नाव दिले आहे.
यावेळी कला शिक्षक श्री. प्रसाद राणे,इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री. विलास ठाकूर,सौ.वैभवी हरमलकर,गणित विषयाचे शिक्षक श्री. संदिप नागभीडकर,अरुण इंगळे व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!