विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला,कणकवलीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला,कणकवलीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला,कणकवलीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी*

*कणकवली : प्रतिनिधी*

विद्यामंदिर प्रशालेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व प्रतिमा पूजनाने शिवजयंती साजरी करण्यात आली.यावेळी “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पवित्र पर्वावर त्यांना शतशः नमन करत प्रशालेचे पर्यवेक्षक श्री.अच्युतराव वनवे सर यांनी महाराजां विषयी बोलताना महाराजांनी
धैर्य, नेतृत्व ,क्षमता आणि स्वराज्य स्थापनेचा आदर्श आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे.महाराजांच्या शिकवणीवर चालत, आपल्याला एक मजबूत आणि एकजुट भारत घडवण्याची प्रेरणा मिळाली याबद्दल मार्गदर्शन केले तसेच उपस्थित शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना शुभेच्छा दिल्या.

प्रशालेचे शिक्षक श्री. विलास ठाकूर सर यांनी महाराजांचे प्रशासन, राज्यकारभार, शिकवण व शासन याविषयी माहिती दिली. प्रशालेचे इतिहास विषयाचे शिक्षक श्री. संदीप कदम सर यांनी महाराजांचे राज्य म्हणजे जनतेचे राज्य हे समतेचे व न्यायचे होते याविषयी विचार मांडले. प्रशालेचे कला शिक्षक श्री. प्रसाद राणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेत विद्यार्थ्यांनी महाराजांनी आपल्यासाठी ठेवलेला अमूल्य ठेवा म्हणजे किल्ले.महाराष्ट्रातील रायगड,प्रतापगड, सिंधुदुर्ग,जंजिरा, शिवनेरी असे अनेक किल्ले तयार केले होते. त्या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाने अतिशय सुंदर आणि नीटनेटके केले होते.तसेच प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी प्रभात फेरी काढली.

मा.ना.नितेशजी राणे साहेब, पालकमंत्री-सिंधुदुर्ग यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात या प्रभातफेरीचे सन्मानाने स्वागत केले आहे.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शेळके जे.जे.सर यांनी अतिसुंदर व ओघवत्या शब्दात केले. कार्यक्रमाची सांगता प्रशालेचे कला शिक्षक श्री. प्रसाद राणे सर यांनी सर्वांचे आभार मानून केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!