*कोंकण एक्सप्रेस*
*श्री.भगवती देवी माध्यमिक हायस्कूलचे चेअरमन आबा मुंज यांना मातृशोक*
*तारामती मुंज यांचे निधन*
*कुडाळ : प्रतिनिधी*
तालुक्यातील आंब्रड बाजारवाडी येथील श्रीमती तारामती भास्कर मुंज वय 98 यांचे रविवार १६ फेब्रुवारी रोजी २ च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुलगे,सुना, जावई,नातू, नातवंडे असा परिवार आहे.
माजी जिल्हापरिषद सदस्य कल्पिता मुंज त्याच्या सासू आणि श्री.भगवती देवी माध्यमिक हायस्कूलचे चेअरमन आबा मुंज यांच्या त्या मातोश्री होत्या.