*कोंकण एक्सप्रेस*
*सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस यांच्या मागणीला यश*
*दोडामार्ग : शुभम गवस*
सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस यांच्या दणक्या नंतर अखेर कुडासा तिठा येथून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. या रस्त्यावर अनेक वेळा अपघात देखील झाले होते. या रस्त्यासाठी चार दिवसांपूर्वी प्रवीण गवस यांनी या रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला होता. बांधकाम विभागाने या इशाऱ्या कडे दुर्लक्ष केले होते. मात्र आज प्रवीण गवस कुडासा तिठा येथे जात या रस्त्यावरून होणारी वाहतूक आपण रोखतो असा इशारा फोन करून अधिकाऱ्यांना दिला. या नंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे होत.
कुडासा तिठा येथे जात रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली. हा रस्ता कुडासा तिठा ते साटेली- भेडशी खालचा बाजार व कोनाळकट्टा ते कोनाळ लोंढे वाडी अश्या दोन टप्यात होणार आहे. रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केल्याने सामाजिक कार्यकर्ते व सरपंच सेवासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रविण गवस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले.