साखरझोपेत असलेल्या दिल्लीकरांना भूकंपाचे धक्के; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सतर्क राहण्याचे आवाहन!

साखरझोपेत असलेल्या दिल्लीकरांना भूकंपाचे धक्के; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सतर्क राहण्याचे आवाहन!

*कोंकण एक्सप्रेस*

*साखरझोपेत असलेल्या दिल्लीकरांना भूकंपाचे धक्के; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सतर्क राहण्याचे आवाहन!*

*दिल्ली*

राष्ट्रीय राजधानीत सोमवारी सकाळी ५.३६ वाजता जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. ४.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे.राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाचे केंद्र दिल्लीत होते. भूकंपाचे केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून फक्त ५ किमी खाली होते. पृष्ठभागापासून पाच किंवा दहा किमी खाली येणारे उथळ भूकंप, पृष्ठभागाच्या खाली येणाऱ्या भूकंपांपेक्षा जास्त नुकसान करतात.

भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना शांत राहण्याचे, सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे आणि ‘संभाव्य आफ्टरशॉक’ साठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. तसंच, अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचीही माहिती त्यांनी एक्सद्वाे दिली.दिल्लीत सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असून भूंकपाच्या दृष्टीने सक्रिय क्षेत्रांच्या झोन चारमध्ये दिल्लीचा समावेश आहे. ही श्रेणी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च श्रेणी आहे.

गेल्या काही वर्षांत दिल्लीत ४ रिश्टर स्केलचे अनेक भूकंप झाले. २०२२ मध्ये दिल्लीच्या शेजारील हरियाणा राज्यात ४.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. हासुद्धा उथळ भूकंप होता. युएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या आकडेवारीनुसार गेल्या १० वर्षांत दिल्लीत ५ रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचा भूंकप नोंदवला गेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!